"कार्यकर्त्यांनो संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन"

"कार्यकर्त्यांनो संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन"

नाशिक : लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर शाब्दीक हल्ले करुन समाचार घेतला. आता निवडणुका संपल्या. त्यामुळे परस्परांतील वाद, कटुता विसरुन एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मिसळ पार्टी आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे यांसह विविध पक्षांचे नेते एकत्र आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला....संपले इलेक्‍शन, आता जपा रिलेशन!

लवाटे नगर येथील फाईव्ह एलीमेंट हॉटेलमध्ये आज सकाळी ही मिसळ पार्टी झाली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, संपादकांसह राजकीय पक्षांच्या पत्रकारांना निमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी भुजबळ, कोकाटे हे दोन्ही उमेदवार उपस्थित होते. शिवसेनेचे उमेदवार, खासदार हेमंत गोडसे परगावी असल्याने ते उपस्थित राहु शकले नाही. मात्र, शिवसेनेचे अजय बोरस्ते, भाजपच्या आमदार सीमा हिरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांसह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील प्रसंग, घडामोडी यावरील चर्चा टाळुन एकमेकांची विचारपुस केली. वाढते उन, दुष्काळ, शहरातील वातावरण याबाबत गप्पा मारल्या. निवडणुका संपल्याने आता सगळे मतभेद, पक्षीय भिंती विसरुन शहरासाठी, नागरीकांच्या प्रश्‍नांसाठी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत हा संदेश त्याद्वारे देण्याचा प्रयत्न होता, असे या नेत्यांनी यावेळी सांगीतले. आमदार सीमा हिरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते, नगरसेवक गुरमित बग्गा, शिवाजी गांगुर्डे यांसह विविध नेते यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने झालेल्या हलक्‍या फुलक्‍या गप्पा, हास्य विनोदातुन या सगळ्यांनीच निवडणुकीचा शीण घालवला. 

निवडणुकीत पक्षीय भूमिका मांडली जाते. त्यासाठी प्रत्येक जण प्रचार करतो. त्यात टीका-टिप्पणी होतेच. मात्र आता निवडणुका संपल्याने आम्ही सगळेच शहराच्या हितासाठी एकत्र येऊन काम करण्यास कटिबध्द आहोत, हा संदेश देण्याचा प्रयत्न मिसळ पार्टीव्दारे झाला
- समीर भुजबळ, माजी खासदार. 

निवडणुका संपल्याने नेते, पक्षांचे पदाधिकारी वाद विसरुन एकत्र येतात. एकमेकांशी चांगले संबंध जपतात व वाढवतात. कार्यकर्त्यांनीही कटुता विसरुन परिसराच्या प्रश्‍नांसाठी एकत्र आले पाहिजे. त्यादृष्टीने मिसळ पार्टी यशस्वी झाली.- माणिकराव कोकाटे, माजी आमदार. 

Web Title : "Activists ended election, now maintain Relation"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com