हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता अमित मिस्त्री याचे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

तेनाली राम , मॅडम सर यासारख्या टीव्ही कार्यक्रमात काम करणारा अभिनेता अमित मिस्त्री याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी या सारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. 

मुंबई: तेनाली राम, मॅडम सर यासारख्या टीव्ही कार्यक्रमात काम करणारा अभिनेता अमित मिस्त्री Amit Mistry याचे हृदयविकाराच्या झटक्याने Heart Attack शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांनी यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी या सारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. Actor Amit Mistry dies due to heart attack

गेल्या काही काळापासून त्यांचे मॅनेजर असणारे महर्षि देसाई यांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली आहे. मृत्यूच्या घटनेबाबत त्यांनी सांगितले कि, “मला  स्वत: ला संपूर्ण धक्का बसला आहे. तो एकदम ठीक होता. आणि फक्त त्याच्या घरी होता. आरोग्याच्या कोणत्याही समस्येबद्दल त्याने तक्रार केली  नव्हती. सकाळच्या न्याहारीनंतर त्याला छातीत अचानक वेदना जाणवू लागली. तो हृदयविकाराचा झटका होता. त्याचे कुटुंब त्याला रुग्णालयात देखील घेऊन जाऊ शकले नाहीत. त्यांच्यासारख्या अभिनेत्याला गमावणे हे करमणूक उद्योगाचे Entertainment industry  मोठे नुकसान आहे. ते माझ्या सदैव आठवणीत राहतील,''

त्याच्या अचानक मृत्यू झाल्याने त्याचे मित्र आणि हितचिंतकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करणे सुरू केले आहे. Actor Amit Mistry dies due to heart attack

त्याचा एक मित्र, निर्माता माहिर खान त्याच्याबरोबर दफा ४२० आणि सावध भारत सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले होते.  त्यांनी म्हंटले आहे की अमित मिस्त्रीच्या मृत्यूची बातमी धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. मी त्याला कधीच तक्रार करताना पाहिले नाही. तो आपल्या कामाबद्दल खूप उत्कट आणि प्रामाणिक होता. तो फक्त एक चांगला अभिनेता नव्हता, तर रत्न होता, जो इतरांना मदत करण्यास नेहमी तयार होता. मला त्याची खूप आठवण येईल,'' त्याच्या अनेक फॅन्स ने त्याच्या मृत्यबद्दल ट्विटर वर शोककळा व्यक्त केली आहे. आम्ही तुमच्या सदैव मिस करू अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. 

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live