लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्न बंधनात

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम आज लग्न बंधनात अडकली आहे. यामीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. दिग्दर्शक आदित्य धरशी याच्याशी  यामी गौतमने लग्न केले आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम Yami Gautam आज लग्न Marriage बंधनात अडकली आहे. यामीने तिच्या सोशल मीडियावर Socail Media पोस्ट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. दिग्दर्शक आदित्य धरशी Aditya Dharयामी गौतमने लग्न केले आहे. actress Yami Gautam Ties Knot With Aditya Dhar 

यामीने सोशल मीडियावर आपल्या लग्नातील फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या यामी आणि आदित्यचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी यामीला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत.

खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने; वाद गेला विकोपाला

इन्स्टाग्राम अकाऊंटवर यामीने लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर आदित्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. actress Yami Gautam Ties Knot With Aditya Dhar 

लग्नातील फोटो शेअर करत यामीने ‘कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्न बंधनात अडकलो. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला आहे असे कॅप्शन दिले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यामीने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. सध्या यामीचे  लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live