२० मे नंतर आदर पूनावाला पाठवणार महाराष्ट्रात १.५ कोटी कोविशिल्डचे डोस

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी २० मे नंतर कोविशिल्डच्या  कोरोव्हायरस रोगाची लस महाराष्ट्रात पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री Health Minister राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Serum Institute of India चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला Adar Poonawala यांनी २० मे नंतर कोविशिल्डच्या Covishields लस महाराष्ट्रात पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. एसआयआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे वचन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांना दिले, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिली.  Adar Poonawala Promised to send 1.5 crore Dose of Covishield for Maharashtra

महाराष्ट्रात लसीची कमतरता आणि कोविड-१९ विरुद्ध १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेस बुधवारी राज्य सरकारने तात्पुरती स्थागिती दिली आहे. 

 हे देखील पहा -

"सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी मुख्यमंत्र्यांना २० मे नंतर कोविशिल्डचे १.५ कोटी डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही ही लस मिळाल्यानंतर १८-४४ वयोगटातील लसीकरण सुरू करू," असे असे देखील राजेश टोपे म्हणाले.Adar Poonawala Promised to send 1.5 crore Dose of Covishield for Maharashtra

खेड तालुक्यात पुरवठ्याअभावी लसीकरण राहणार बंद

बुधवारी १८-४४ वयोगटातील लसींच्या अनुपलब्धतेमुळे लसीकरण थांबविण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर टोपे म्हणाले की, “लसींच्या कमतरतेमुळे १८-४४ वयोगटातील लसीकरण सध्या थांबविण्यात आले आहे. राज्य सरकारने खरेदी केलेले सर्व डोस आता 45 वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी वळविण्यात येतील," असे टोपे म्हणाले.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live