पुनावाला तुम्ही पुण्याचे...महाराष्ट्राला झुकतं माप द्या...

लक्ष्मण सोळुंके
सोमवार, 3 मे 2021

आदर पुनावाला हे पुण्याचे आहेत. त्यामुळे लसींबाबत पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकत माफ द्यावं, महाराष्ट्र लसीकरणाची किंमत मोजण्यास तयार आहे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे

जालना :  आदर पुनावाला हे पुण्याचे आहेत. त्यामुळे लसींबाबत पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकत माफ द्यावं, महाराष्ट्र लसीकरणाची किंमत मोजण्यास तयार आहे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकार लसीकरणाची किंमत मोजण्यास तयार आहे, असेही टोपे म्हणाले. Adar Poonawala should give priority to Maharashtra about Covid vaccine appeal by Rajesh Tope

याबाबत टोपे म्हणाले, "लस जुलै आॅगस्टमध्ये उपलब्ध होईल, असे पुनावाला म्हणाले आहेत. मात्र, कुठल्याही परिस्थितीत आम्हाला १८ ते ४४  वयोगटातील लोकांचे लसीकरण करायचे आहे. मात्र, पुरेशी लस मिळत नसल्याने गती कमी पडते आहे. त्यामुळे लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आम्हाला अधिक लस उपलब्ध करुन द्यावी, अशी आमची विनंती आहे,"

विदर्भात कोरोना व्हायरसचा म्युटेट झालेला वेगळा डिफ्रंट व्हेरियस सापडलाय. त्या साठी जिनोमिक्स सिक्वेन्सिंग ला महत्व देऊन त्यावर  ही राज्य सरकार खर्च करणार आहे. व्हायरसचे विविध औषधांमुळे म्युटेशन होते व त्याचे वेगवेगळे परिणाम असतात त्यामुळे जिनोमिक्स सिक्वेन्सिंग करून घेणं हा एक अत्यंत महत्वाचा विषय असल्याने राज्य शासन त्यामध्ये पूर्वपणेणे  लक्ष घालणार'' असेही टोपे यांनी सांगितले. Adar Poonawala should give priority to Maharashtra about Covid vaccine appeal by Rajesh Tope

अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांनी भारतात लाॅकडाऊन लावावा लागेल असे म्हटले आहे. सध्या भारतात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकार लाॅकडाऊनबाबत जो काही निर्णय घेईल तो निर्णय राज्याला मान्य असेल, असे सांगत केंद्र सरकार लाॅकडाऊन बाबत लवकरच निर्णय घेईल असे सूचक संकेत टोपे यांनी दिले.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live