आदित्य ठाकरेंना मिळणार  झेड प्लस सुरक्षा  

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

मुंबई  : युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाय प्लस सुरक्षेत वाढ करून  त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे तर भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत मात्र कमी करण्यात आली आहे.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची वाय प्लस असलेली सुरक्षा वाढवून झेड दर्जाची करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची झेड प्लस सुरक्षा कमी करून ती वाय दर्जाची करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर यांची एक्स दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

मुंबई  : युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाय प्लस सुरक्षेत वाढ करून  त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे तर भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत मात्र कमी करण्यात आली आहे.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची वाय प्लस असलेली सुरक्षा वाढवून झेड दर्जाची करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची झेड प्लस सुरक्षा कमी करून ती वाय दर्जाची करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर यांची एक्स दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.  यापुढे त्यांना पोलीस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असेल.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना वाय दर्जाच्या सुरक्षेतील एस्कॉर्ट काढून घेण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आता दोन कॉन्स्टेबल असतील. तसेच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेतही बदल करण्यात आला आहे. त्यांची एस्कॉर्ट सुरक्षा काढण्याचा निर्णय उद्धव सरकारने घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा घटवून ती वाय करण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी राज्यपाल राम नाईक यांच्या सुरक्षेच्या दर्जातही बदल केला असून, त्यांची झेड प्लस सुरक्षा कमी करून ती एक्स दर्जाची केली आहे. 

WebTittle :: Aditya Thackeray gets Z plus security


 

संबंधित बातम्या

Saam TV Live