आदित्य ठाकरेंचं गणेश दर्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणेश दर्शन केलं. लालबागचा राजा आणि चिंतामणी येथे आरती देखील केली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवडी विधानसभा मतदारसंघाचीही चाचपणी सुरू आहे.त्यामुळे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे शिवडी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणुक लढवणार अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने शिवडी-लालबाग परिसर पिंजून काढत अनेक ठिकाणी श्रीगणेशाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजाच्या चरणी तर त्यांनी तब्बल 21 सेकंद डोकं ठेवतं मनोभावे प्रार्थना केली. यानंतर त्यांनी चिंतामणी गणपतीच्या आरती सोहळ्यात देखील सहभाग घेतला. शिवडी मधील अनेक गणपती मंडळांना भेटी देत त्यांनी दर्शन घेतलं.यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासोबतच आदित्य आपल्या राजकीय श्रीगणेशाची चाचपणी करत असल्याचं ही बोललं जातं आहे.

आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यावर राजकीय तर्क-वितर्क सुरू आहेत.वरळी मतदार संघातील माजी आमदार सचिन अहिर शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आदित्य वरळी मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली.मात्र या मतदार संघावर शिवसेनेने अजून शिक्कामोर्तब केलेले नाही.आदित्य यांच्यासाठी शिवडी मतदार संघाची चाचपणी सुरू असल्याचे ही बोलले जात आहे.यातच आज आदित्य यांनी शिवडी मतदार संघातील गणपती मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावल्याने आता आदित्य हे शिवडी मतदार संघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

Web Title:Aditya Thackeray's Ganesh Darshan

संबंधित बातम्या

Saam TV Live