'आरे'ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार 

'आरे'ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार 

मुंबई : मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी देत आहेत, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले.  महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जमत नसेल तर सरकारने दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणीही आदित्य यांनी अश्विनी भिडे यांचा नामोल्लेख न करता केली. आमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे.
आरेमधील कारशेडच्या जागेजवळ बिबटे, दुर्मीळ रानमांजरासह विविध प्राण्यांचा वावर असतो.  त्याचबरोबर पावसाळ्यात मिठी नदीला पूर येऊन आंतरराष्ट्रीय विमानतळासह आसपासचा परिसर पाण्याखाली जाईल, असे मत तज्ज्ञांनी प्रकल्पाबाबत दिले होते.मुंबई महानगरपालिकेच्या समितीनेही आरेऐवजी कांजूरमार्गची जागा सुचवली होती, याकडे खानोलकर व सानप यांनी लक्ष वेधले. कारशेडसाठी इतर जागांचा पर्याय असताना ‘आरेच का रे’, असा सवाल ठाकरे यांनी केला. राजकीय हेतूने नाही तर मुंबईकर म्हणून आरे कारशेडला विरोध करत आहोत असे स्पष्ट केले. ‘आरे’मधील कारशेडच्या विरोधातील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आरेमधील मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यासाठी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात  वन्यजीव अभ्यासक नयन खानोलकर आणि राजेश सानप यांनी या वेळी आरेमधील जैवविविधतेचे दर्शन घडवणारे सादरीकरण केले. 

Web Title: Aditya Thackeray's initiative to save 'Aare'


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com