वालधुनी नदीचा झाला नाला; नदी स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अजय दुधाणे
शुक्रवार, 7 मे 2021

वालधुनी नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती. १९२३ मध्ये ब्रिटिशांनी याच नदीवर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे तलाव बांधला. या तलावातून कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यात येत असे. सह्याद्रीच्या तळटेकड्यात उगम पावून ही नदी अंबरनाथ  उल्हासनगर आणि कल्याण तालुक्यातून वाहते. मात्र आता या वालधुनी नदी चा सध्या नाला झाला आहे.

ठाणे: वालधुनी नदी Valadhuni river ही ठाणे Thane जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती. १९२३ मध्ये ब्रिटिशांनी British याच नदीवर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे तलाव बांधला. या तलावातून कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यात येत असे. सह्याद्रीच्या तळटेकड्यात उगम पावून ही नदी अंबरनाथ Ambarnath उल्हासनगर Ulhasnagar आणि कल्याण Kalyan तालुक्यातून वाहते. मात्र आता या वालधुनी नदी चा सध्या नाला झाला आहे. Administration neglecting cleanliness of the Valadhuni river

या नदीला जुना इतिहास आहे. इ.स. १०३० च्या सुमारास या भागात मोठा दुष्काळ पडला असता तत्कालीन शिलाहार राज्यकर्त्यांनी कृत्रिमरीत्या या नदीचे पात्र खोदले असे काही अभ्यासकांचे मत आहे. १९७० च्या दशकापर्यंत वालधुनी नदीत बाराही महिने पाणी असे. त्यानंतर या नदीचे एका मोठ्या सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे. १९८५ पूर्वी या नदीचे पाणी वापरण्यास घ्यायचे. अंबरनाथ एम आय डी सी मधून तसेच अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण या शहरांनमधील सांडपाणी यामुळे ही नदी काळी निळी झाली आहे. लहान-मोठ्या कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी या नदीला येऊन मिळते.

हे देखील पहा -

एकेकाळी या परिसरातील जीवन फुलविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या या नदीमुळे आता पात्रालगतच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आसपासचे कारखाने रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करून वालधुनी नदीत सोडतात का यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नियंत्रण ठेवत असते. परंतु औद्यागिक सांडपाण्यापेक्षा प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी वालधुनीच्या पात्रात नियमित सोडले जाते. आणि यावर आळा बसणे अतिशय जरुरीचे आहे. अनेक कारवाया झाल्या मात्र नदीची अवस्था जैसे थे तैसे आहे. Administration neglecting cleanliness of the Valadhuni river

मावळमध्ये ६ दिवसांचा कडक लॉकडाउन

 

देशात या नदीचा प्रदुषित नदीन मध्ये दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आणि स्थानिक प्रशासन ही नदी स्वच्छ करण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नसल्याने या नदीची अवस्था अशी झाली आहे. 

वालाधुनी बिरादरी ही अनेक वर्ष या नदी च्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहे. 500 करोड रुपयांपर्यंत विविध योजना या नदीच्या स्वच्छतेसाठी मंजूर करण्यात आलेत. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या योजना कागदावरच आहेत. 

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live