नवी मुंबईत प्रशासकीय राजवट लागू होणार

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 7 मे 2020

विद्यमान नगरसेवकांचा गुरूवारी शेवटचा दिवस असणार आहे. ८ मेपासून महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ प्रशासक म्हणून काम पाहतील.  कार्यकाळ संपल्यामुळे महापौर व इतर पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा करून घेण्यात आली आहेत.

नवी मुंबई :महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होणार असून सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा करण्यात आली आहेत.  महानगरपालिकेतील १११ नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मे रोजी संपत आहे. 

विद्यमान नगरसेवकांचा गुरूवारी शेवटचा दिवस असणार आहे. ८ मेपासून महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ प्रशासक म्हणून काम पाहतील.  कार्यकाळ संपल्यामुळे महापौर व इतर पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा करून घेण्यात आली आहेत. पुढील निवडणूक होईपर्यंत महानगरपालिकेतील सर्व प्रस्ताव व निविदांना मंजुरी देण्याचे व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार ही आयुक्तांना असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मे २०२० पर्यंत आहे. या कालावधीपूर्वी सहावी पंचवार्षिक निवडणूक होणे आवश्यक होते. निवडणूक विभागाने यासाठी कार्यवाही ही सुरू केली होती, परंतु कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

 

WebTittle ::  Administrative rule will be implemented in Navi Mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live