प्रतिक जयंत पाटील यांचा कौतुकास्पद निर्णय

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

१ मे रोजी होणाऱ्या लसीकरणाबाबत निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी म्हंटले आहे कि, 'लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार' आहोत. या निर्णयामुळे त्यांचे राजकीय पक्षात कौतुक केले जात आहे. 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांचे मोठे चिरंजीव प्रतिक जयंत पाटील Pratik Jayant Patil यांनी १ मे रोजी होणाऱ्या लसीकरणाबाबत Vaccination निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी म्हंटले आहे कि, 'लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार' आहोत. या निर्णयामुळे त्यांचे राजकीय पक्षात कौतुक केले जात आहे. Admirable decision of Pratik Jayant Patil

स्वतःच्या लसीकरण  केल्याचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार आहेत. याबाबत त्यांनी राज्यातील तरुणांना ही आवाहन केले आहे. कोरोना लस घेण्यास प्रवृत्त केले आहे.

तसेच सांगितले कि, आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला CM Fund मदत म्हणून द्यावेत'. कोरोनामुळे Corona सर्व व्यापार तसेच सर्वकाही ठप्प पडले आहे. राज्य सरकार जमेल तेवढे प्रयत्न करत आहे. परंतु या कोरोनामुळे मागे पडलेल्या आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या नितांत गरज आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live