पुण्याच्या प्रांजलचे कौतुकास्पद रेकॉर्ड

pranjali pune
pranjali pune

पुणे - महाराष्ट्रातील Maharashtra सर्वोच्च शिखर Peak कळसुबाई Kalsubai सर करणारी साडे चार वर्षांची सर्वात लहान वयाची मुलगी. तसेच 60 सेकंदमध्ये सर्वाधिक 40 साहित्यांची नावे सांगणारी सर्वात लहान मुलगी आहे. त्यासोबतच 54 सेकंद मध्ये भारतातील 45 प्रसिद्ध व्यक्तींच्या समाधी स्थळाची नावे सांगणारी ही सर्वात लहान मुलगी म्हणून प्रांजल उद्धव चव्हाण हिची " एशिया बुक ऑफ रेकॉर्ड" Asia Book of Records तसेच " इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड"India Book of Records मध्ये  हेट्रिक करणारी भारतातील पहिली सर्वात लहान वयाची मुलगी ठरली आहे. Admirable record of Pranjal from Pune

हे देखील पहा -

प्रांजल ही मूळची देवताळा ता.औसा येथील राहणारी असून तिचे वडील उद्धव चव्हाण हे जुन्नर तालुक्यातील आर्वी या ठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत आहे. प्रांजल हिने वयाच्या चौथ्या वर्षीच महाराष्ट्रातील सर्वात अवघड गड किल्ले शिवनेरी, चावंड, हडसर, नारायणगड, हरिशचंद्र गड सर करण्याचा बहुमान मिळवला आहे. Admirable record of Pranjal from Pune

राज्यातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई शिखर प्रांजलने दोन तास 58 मिनिटात सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रांजल उद्धव चव्हाण हिची " एशिया बुक ऑफ रेकॉर्ड" तसेच " इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये  हेट्रिक करणारी भारतातील पहिली सर्वात लहान वयाची मुलगी ठरली आहे. 

Edited By - Shivani Tichkule 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com