नितीश कुमारांना दिग्विजय सिंगांचं आर्जव, BJP ची साथ सोडण्याचा दिला सल्ला

साम टीव्ही
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020
  • नितीश कुमारांना दिग्विजय सिंगांचं आर्जव
  • BJP ची साथ सोडण्याचा दिला सल्ला
  • तेजस्वींना पाठबळ देण्याची विनंती 

बिहारमध्ये एनडीएच्या सत्तास्थापनेची तयारी सुरू असताना काँग्रेसने मात्र नितिश कुमारांना भावनिक साद घातलीय.

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. पण काँग्रेसने मात्र अजूनही सत्तेची आशा सोडलेली दिसत नाही. अवघ्या 19 जागा जिंकूनही काँग्रेसने नितीश कुमारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट करत नितीश कुमारांना साद घातलीय.

'भाजपा आणि संघ हे अमरवेलीसारखे आहेत. अमरवेल आंब्याच्या झाडाला लगडून सगळा रस शोषून स्वत: वाढते. झाडाला मात्र सुकवून टाकते. लालूप्रसाद आणि आपण एकत्र संघर्ष केलाय. अनेक आंदोलनात तुरुंगवासही भोगलाय. संघरूपी अमरवेलीची साथ सोडून तेजस्वी यादवांना पाठबळ द्या.'

राजद आणि काँग्रेस महाआघाडीकडे 110 जागा असून बहुमतासाठी त्यांना 12 जागांची गरज आहे. नितीश कुमारांची साथ मिळाल्यास भाजपला बाहेर ठेवत बिहारमध्येही 'महाराष्ट्र पॅटर्न' साकारला जाऊ शकतो, अशी आशा काँग्रेसला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live