चीनी ऍप्सनंतर आता चीनी वस्तुंवरही बंदी घालणार, वाचा कोणत्या असतील त्या वस्तू?

चीनी ऍप्सनंतर आता चीनी वस्तुंवरही बंदी घालणार, वाचा कोणत्या असतील त्या वस्तू?

आता बातमी चिनी वस्तूंवर बंदीची. कोरोनाच्या संकटातही आपल्याला डिवचणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसलीय. 59 चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर आता भारत अनेक चिनी वस्तूंना हद्दपार करणारेय... कोणत्या आहेत या चिनी वस्तू पाहूयात.

कोरोनाविरोधात संपूर्ण जग लढत असताना चीन मात्र भारताविरोधात कुरापती करतोय. भारताच्या सीमेवर चीनच्या उचापती थांबायचं नाव घेईनात. म्हणूनच भारतानेही चिनी व्सतूंवर बहिष्काराचं हत्यार उपसलंय. 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचं धडाडीचं काम भारताने आधीच केलंय. मात्र भारतात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंवरही सरकार बंदी घालण्याच्या विचारात आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, एसीसारख्या वस्तूंवर भारत बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
GFX IN
चिनी वस्तूंची कशी होणार हकालपट्टी?
आपल्या मोबाईलमध्ये ठाण मांडून बसलेल्या 59 चिनी अॅपची हकालपट्टी भारत सरकारने केलीय. त्याचसोबत आता चिनी कंपन्यांनी बनवलेल्या टीव्ही, फ्रीज आणि एसींवरही भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. म्हणजेच Huawei सारख्या चिनी कंपन्यांच्या उपकरणांवर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत येऊ घातलेल्या 5 G स्पेक्ट्रमचे टेंडर ज्या चिनी कंपन्यांना दिलंय, तेही रद्द करण्याच्या हालचाली भारताने सुरू केल्यायत.
GFX OUT
याचाच अर्थ असा की, भारत सरकारने चीनविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केलीय. चिनी कंपन्यांनी बनवलेले टीव्ही, फ्रीज, एसीवर भारतात बंदी येऊ शकतेच, मात्र त्याचसोबत इतरही 10 ते 12 चिनी उत्पादनांवरही भारताने बंदी घालण्याची तयारी सुरू केलीय. कोरोनामुळे जगाच्या तोंडाला मास्क लावणाऱ्या चीनच्या मुसक्या आवळण्याची हीच वेळ आहे, त्यामुळे आपणही चिनी वस्तू घेताना दहावेळा विचार करायला हवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com