दहा तास तुफानाशी सामना करून तो घरी सुखरूप परतला !

satara
satara

सातारा - तुफानाशी सामना करण्याच्या वाढीव गप्पा आज पर्यंत आपण अनेक जणांच्या कडून ऐकल्या असतील. परंतु सातारा Satara जिल्ह्यातील वायचळवाडी या गावचे अनिल वायचळ हे खरोखर एक दोन नव्हे तर तब्बल 10 तास तुफानाशी सामना करून अखेर स्वतःच्या घरी सुखरूप परतले आहेत. After battling the storm for ten hours he returned home safely

तोक्ते Tauktae चक्री वादळामुळे Cyclone खवळलेल्या समुद्रात Sea बार्ज बुडाल्याने डोंगरा एवढ्या लाटांशी दहा तास झुंज देऊन जिगरबाज अनिल वायचळ सातारा जिल्ह्यातील वायचळवाडी या आपल्या मूळगावी परतल्यानंतर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली त्यांची वृद्ध आई व ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

माझा ढाण्या वाघ परत आला' असे म्हणत आई श्रीमती शांताबाई यांनी आपल्या जिगरबाज पोराला कडकडून मिठी मारत अश्रूना मोकळी वाट करून दिली आणि सारे वातावरणच गलबलून गेले. After battling the storm for ten hours he returned home safely

अनिल वायचळ हे मुंबईत Mumbai अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अरबी Arab Sea समुद्रातील ओएनजीसीच्या ONGC प्लॅन्टवर या कंपनीचे काम सुरू असल्याने सहकाऱ्यांसमवेत ते तिकडे ड्युटीवर होते.

१७ मे रोजी त्यांनी मोबाईलवरून घरच्यांना मेसेज केला आणि त्यानंतर त्यांचा संपर्कच तुटला होता. वादळामुळे समुद्र खवळल्याने उंचच उंच लाटा उसळू लागल्या अनिल व त्यांचे सहकारी थांबलेल्या बार्जमध्ये पाणी घुसल्याने पाचच्या सुमारास त्यांना लाईफ Life जॅकेटसह Jacket पाण्यात उड्या घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.त्या घेताना काहीजण अडकून भरकटले. After battling the storm for ten hours he returned home safely

हे देखील पहा -

तर काही एकमेकांचे हात पकडून पाण्यावर तरंगत राहिले. अनिल यांनी दहा तास जणू जगण्या मरण्याची लढाईच लढली. त्या रात्री अडीच वाजता नौदलाचे बचाव पथक पोहचल्यावर त्यांना बोटीवर घेवून नंतर किनाऱ्यावर आणण्यात आले. तेव्हापासून त्यांची आई, कुटुंबीय व गावाकडची मंडळी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले होते.

Edited By : Krushnarav Sathe 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com