पाच वर्षाच्या खंडानंतर 'भुजबळ फार्म' झाले नाशिकचे सत्ताकेंद्र

पाच वर्षाच्या खंडानंतर 'भुजबळ फार्म' झाले नाशिकचे सत्ताकेंद्र

छगन भुजबळ १९९९ ते २०१४ असे सलग राज्यात महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते. या कालावधीत ते नाशिकचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जिल्ह्याचे प्रशासन दोन्हीची सूत्रे भुजबळ फार्म येथून हलत होती

 छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा 'भुजबळ फार्म' नाशिकचे सत्ता केंद्र बनले. गेली पाच वर्षे गिरीश महाजन पालकमंत्री होते. त्यांनी पदाचा वापर सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी केला. आता भुजबळ रेंगाळलेल्या विकासाला गती कशी देतात याची उत्सुकता आहे.

श्री. भुजबळ १९९९ ते २०१४ असे सलग राज्यात महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते. या कालावधीत ते नाशिकचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जिल्ह्याचे प्रशासन दोन्हीची सूत्रे येथून हलत होती. त्यावर भुजबळ समर्थकांचे काटेकोर नियंत्रण होते. त्यामुळे अनेक विकासाचे कामे मार्गी लागली. मधल्या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्तांतर झाले. भाजपचे सरकार आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन पालकमंत्री झाले. त्यात सुरु असलेली विकासकामे थांबली. सर्व लक्ष सत्ताकेंद्र निर्माण करण्यावर होते. त्यात ते यशस्वी झाले. 

नाशिक महापालिका, जिल्हा बॅंक, त्र्यंबकेश्वरसह विविध नगरपालिका, कॅन्टोनमेंट बोर्ड, बाजार समिती भाजपने ताब्यात घेतल्या. त्यात सत्ता असताना भुजबळांचे निकटवर्तीय असलेलेच भाजपचे कट्टर समर्थक बनले. यातील अनेक आता वारे बदलल्याने भुजबळ फार्म दिसू लागले आहेत. भुजबळ पुन्हा सत्ताकेंद्र बनल्याने विकासाला नक्की गती मिळेल. रखडलेली कामे सुरु होतील. मात्र गेल्या पाच वर्षांत अडचणीच्या काळात जे भुजबळांबरोबर राहिले ते या परत फिरलेल्या पक्षांच्या थव्यामुळे अस्वस्थ होऊ लागले आहेत. विस्कटलेली सत्तास्थानांची घडी बसवायला दुर गेलेले जवळ करावे लागतील. हा मेळ पालकमंत्री झालेले छगन भुजबळ कसा बसवणार याची उत्सुकता आहे.

यंदा शिवसेना, काँग्रेस हे दोन्ही पक्ष सहकारी आहेत. त्यांच्या मदतीने वाटचाल करावी लागणार आहे. यात भाजप एकटा पडू लागल्याने नाशिकचे राजकारण नव्या वाटेने जाण्याचे संकेत आहेत. यात राजकारणाचे व्हायचे ते होईल. मात्र, १५ पैकी ९ आमदार महाविकास आघाडीचे आहेत. श्री भुजबळ पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे विकासाला त्याची मदत नक्कीच होईल.

WebTittle :After a break of five years 'Bhujbal Farm' became the ruling center of Nashik


 

 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com