जगात १४ टक्के लोकांना कोरोनानंतर होतोय आजार

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 31 मे 2021

गेल्या दीड वर्षापासून जगात कोविड-19 विषाणूच्या महामारीमुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दीड वर्षापासून जगात कोविड- 19 विषाणूच्या (Coronavirus) महामारीमुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र अद्यापही जगभरात कोविडचा हाहाकार सुरूच आहे. अशात अलीकडे आलेल्या आजारांमुळे तर संपूर्ण जगाची चिंता अजूनच वाढली आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात करोडो लोकांना  कोविड- 19 चा संसर्ग झाला आहे. मात्र आता हाच कोविड 14 टक्के रुग्णांना नवीन आजार देऊन जात आहे. अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. लंडनमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात हा दावा केला आहे.(After corona, 14% of people get sick)

Breaking राज्यातला लाॅकडाऊन १५ जून पर्यंत वाढवला

१.९३ लाख रुग्णांवर केले संशोधन 
ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील सार्वजनिक संशोधनानुसार, संसर्गानंतर रुग्ण बरे झाले असला तरी त्यांच्यात नवीन आजार होण्याचा धोकाही वाढला आहे. हे समजण्यासाठी लंडनच्या शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर दरम्यान कोरोनातून बरे झालेल्या  1,93,113 रूग्णांवर संशोधन केले. यामध्ये 18 ते 65 वयोगटातील रुग्णांचा समावेश होता.
 

बरे झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत निरीक्षण केले
रुग्णाला संसर्ग झाल्यानंतर 21 दिवस संशोधकांनी कोरोना रूग्णांच्या आरोग्याचे निरीक्षण केले.  या व्यतिरिक्त, ‘नॅशनल क्लेम डाटा’ चे विश्लेषण करून, संक्रमणातून बरे झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांत किती रुग्णांमध्ये  नवीन आजार दिसून आले, याचे परीक्षण करण्यात आले.  या आकडेवारीची तुलना त्यांच्याशी केली गेली ज्यांना कोरोनाचा संसर्ग कधी झाला नाही. परिणामी, रुग्ण बरे झाल्यानंतर सुमारे 14 टक्के रुग्णांमध्ये नवीन आजारांच्या समस्या दिसून आल्या. यामुळे रुग्ण वारंवार  रुग्णालयात जात होते. 

कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाला पुरावा

तरुणांमध्ये नवीन आजाराचा सर्वाधिक धोका 
संशोधक एलेन मॅक्सवेल म्हणतात, कोरोनामधून बरे झाल्यानंतर वृद्धापेक्षा तरुणांमध्ये नवीन आजाराचा धोका जास्त दिसून आला आहे. हे तरुण  असे होते ज्यांना कोरोनापूर्वी आजारांची कधीही कोणतीही समस्या नव्हती. तसेच, कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना दीर्घकालीन काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्लाही संशोधकांनी दिला  आहे.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा 


संबंधित बातम्या

Saam TV Live