बदलापूर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?महाविकास आघाडीचं आव्हान भाजप कसं पेलवणार

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021
  • बदलापूर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?
  • आघाडी झाली तरी शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत येणार ?
  • महाविकास आघाडीचं आव्हान भाजप कसं पेलवणार

ग्रामपंचायती निवडणुकानंतर आता राज्यात लवकरच नगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.यामध्ये कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीत काय असू शकतात राजकीय समिकरणं पाहुयात खास रिपोर्ट

 कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागते,या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच निवडणुका एकत्र लढण्यावर नेत्यांकडून जोर दिला जातोय.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये काही ठिकाणी का होईना पण महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला.नगरपालिका निवडणुकीतही महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न असणार आहे. कुळगाव-बदलापूरमध्ये मात्र महाविकास आघाडी झाली तर ठिक नाही तर स्वबळावर लढणार अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय.

वामन म्हात्रे (नगरसेवक ,बदलापूर शिवसेना शहरप्रमुख)

महाविकास आघाडी पॅटर्नचा सर्वांना फायदा होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.मात्र त्याच वेळी बंडखोरीची भीतीही त्यांनी व्यक्त केलीय
 

कुळगाव-बदलापूरमध्ये फडणवीस सरकारच्या काळात अनेक विकास कामं झालीत.त्यामुळे मतदार भाजपलाच सत्तेत बसवतील असा दावा भाजपकडून करण्यात येतोय राजेंद्र घोरपडे (जेष्ठ नगरसेवक)

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत एकूण 47 नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे 25,भाजपचे 20,राष्ट्रवादी काँग्रेसचे 2  नगरसेवक आहेत.काँग्रेस,मनसेचा एकही नगरसेवक नाही.

.अशा परिस्थितीत जागा वाटप हे महाविकास आघाडी समोरचं मोठं आव्हान असणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live