Big Breaking - अनिल देशमुखांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. After High Court Decision Anil Deshmukh Resigned as Home Miniset

देशमुख यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटून राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याला पवार यांनी संमती दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. आता राज्याचे नवे गृहमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

हे देखिल वाचा - अनिल देशमुखांना धक्का

तूर्तास गृहमंत्रीपद मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली होती. देशमुखांवर झालेल्या आरोपांबाबत काहीही तथ्य नाही. पण नैतिक मुद्द्यावर देशमुख यांनी राजीनामा दिला आहे, असे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. After High Court Decision Anil Deshmukh Resigned as Home Miniset

सीबीआय चौकशीचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमीका देशमुख यांनी पवार यांच्याकडे मांडली व राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला पवार यांनी होकार दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला, असे मलिक यांनी सांगितले. 

Edited by- Sanika Gade. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live