'लढाईसाठी मजबूर कराल तर चांगलाच धडा शिकवू', भारत, अमेरिकेनंतर तैवाननेही चीनविरुद्ध दंड थोपटले

साम टीव्ही
रविवार, 23 ऑगस्ट 2020
  • 'लढाईसाठी मजबूर कराल तर चांगलाच धडा शिकवू'
  • भारत, अमेरिकेनंतर तैवाननेही चीनविरुद्ध दंड थोपटले
  • ट्रम्प हसत आहेत... चीन जळतो आहे

चीनविरोधात जगभरातले बहुतांश देश एकवटले असताना आता तैवाननेही चीनविरुद्ध दंड थोपटलेत. लढाईला भाग पाडाल तर चीनला सडेतोड उत्तर देण्याची धमकी तैवानने चीनला दिलीय.

उरात धडकी भरवणारा हा आवाज आता चीनची झोप उडवणारेय. कारण तैवानने केलेल्या लष्करी कवायतींमधून स्वत:चं सामर्थ्य दाखवून दिलंय. गेल्या काही महिन्यांपासून चीन भारत, अमेरिकेसह अनेक देशांना त्रासदायक ठरतील अशी पावलं उचलतोय. त्यामुळे चीनविरोधात अनेक देश एकवटतायत. त्यातच आता तैवाननेही चीनला जाहीर धमकी दिलीय. तीही व्हिडीओ जाहीर करून.

तैवान उडवणार चीनची झोप
तैवानने चीनला जाहीर आव्हान दिलंय, की चीनने जर लढाई करण्यास भाग पाडलं तर तैवान चीनला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरंतर हल्लीच अमेरिकेकडून F-16V फाइटर जेट खरेदी करण्याचा करार तैवानने केलाय. आधी तैवान F-16V फाइटर जेट चीनकडून खरेदी करणार होतं, मात्र तैवान हे लढाऊ विमान अमेरिकेकडून घेत असल्याने चीनचा जळफळाट झालाय.

लष्करी कवायतींमधून तैवाननं चीनला लष्करी ताकदीचं दर्शन घडवलंय. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसारख्या अनेक देशांनी चीनविरोधात मोहीम उघडलीय. याच देशांच्या पंगतीत आता तैवानही आलाय. या सगळ्या घडामोडींमुळे डोनाल्ड ट्रम्प हसतायत तर, चीन जळतोय असं काहीसं चित्र उभं राहिलंय. कोरोनाच्या संकटातही अनेक देशांना त्रास देणाऱ्या चीनची पुढची वाटचाल सोपी नसणार हे उघड सत्य आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live