खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला खानदेशात दुसरा मोठा धक्का

EKNATH KHADASE
EKNATH KHADASE

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला खानदेशात मोठा धक्का बसला. यातच आता मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड केले आहे. मुक्ताईनगरमधील भाजपच्या सात विद्यमान आणि तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहा आजी- माजी नगरसेवकांनी हाती अखेर शिवबंधन बांधले आहे. खानदेशातील शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराब पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.(After Khadse's entry into the NCP, the BJP suffered another major blow in Khandesh)

शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य चार जणांचा यामध्ये समावेश आहे. आजी माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे जळगावमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपमधील सर्वात अनुभवी नेते विरोधी पक्षनेतेपदी कार्यभार भूषवलेले एकनाथ खडसे भाजपमध्ये अडगळीत पडले होते. त्यामुळे त्यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीची वाट धरली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात शिवसेनेतील बड्या नेत्यांना हाताशी धरत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याची प्रक्रिया चालवली असल्याचं पहायला मिळत आहे.

हे देखील पाहा

जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या नाकावर टिच्चून महापौरपदाच्या निवडणूकीत विजय संपादन केला होता. या निवडणूकीपूर्वी भाजपमधील 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजपला अपेक्षेप्रमाणे विजय संपादन करता आला नव्हता. अखेर शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी विजय संपादन केला होता. या रंगतदार निवडणूकीत फक्त 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांना निवडणूकीत 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मतांवरच समाधान मानावे लागले होते. उपमहापौरपदाच्या निवडणूकीत भाजपमधून बंडखोरी करत बाहेर पडलेले कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली होती.

शिवसेनेचा जळगावमधील विजय हा भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का मानला गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकनाथ खडसे यांच्या रुपाने भाजपमधील एका नावाजलेल्या नेत्याला आपल्या गळाला लावले. त्यानंतर खडसे यांच्या माध्यमातून भाजपच्या 13 नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले. आणि विशेष म्हणजे त्यांचा पक्षप्रवेश  नगरपालिका निवडणूकीच्या पूर्वीच घडवून आणला होता. जळगाव भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात होता.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com