आईनंतर मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू ; 15 दिवसांनी साक्षात दारात उभी राहिली तीच महिला.. 

After the mother the child also died due to corona
After the mother the child also died due to corona

हैदराबाद : आंध्र प्रदेश मधील Andhra Pradesh एका 75 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर, कुटुंबावर मोठा धक्का बसला. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात राहणाऱ्य व कोरोनाची Corona लागण झालेल्या Coronavirus गिरिजम्मा यांना रुग्णालयात मृत म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मात्र, 15 दिवसांनी आजीला दारात उभं असलेलं पाहून कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला. After the mother the child also died due to corona

नेमका काय आहे हा प्रकार?

कृष्णा Krishna जिल्ह्यातील क्रिश्चियनपेट भागातील गिरिजम्मा नावाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 12 मे या दिवशी विजयवाडा Vijayawada येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेला दाखल केल्यानंतर पती घरी परतले. 15 मे दिवशी पत्नीची प्रकृती विचारण्यासाठी ते रुग्णालयात आले, तेव्हा गिरिजाम्मा बेडवर नव्हती आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितलं की, त्यांना दुसऱ्या वॉर्डात ठेवण्यात आलं असावं. 

रुग्णालयातील सर्व वार्डात ward शोधल्यानंतर गिरिजम्मा काय सापडल्या नाहीत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शवगृहात पाहिलं असता. शवगृहात त्यांच्या पत्नीसारख्या एका महिलेचा मृतदेह दिसला. त्यानंतर, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी डेथ सर्टिफिकेट Certificate त्यांना दिल. इतकच नाही तर, कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले व त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केल. After the mother the child also died due to corona

हे देखील पहा 

मुलाचा कोरोनामुळे मृत्यू.. 

गिरिजम्मा यांचा मुलगा रमेश याचा 23 मे या दिवशी कोरोनाची लागण होऊन त्याचा देखील मृत्यू झाला. कुटुंबाने त्याच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांनी गिरिजम्मा आणि रमेश दोघांसाठी प्रार्थनासभेचं आयोजनही केलं होत. घरातील सदस्यांना वाटले की, आजीचाही मृत्यू झाला आहे. कोणीही रुग्णालयातही गेलं नाही. दुसरीकडे गिरिजम्मा रुग्णालयात विचार करीत होती की, तिला घेऊन जाण्यासाठी कोणीच का आलं नाही. यानंतर 1 जून या दिवशी स्वत:च घरी परतले. गिरिजम्मा यांना पाहून कुटुंबाबरोबरच सर्वांनाच धक्का बसला. अर्थात हा सर्वांसाठी सुखद धक्का होता.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com