नाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणूकीच्या यशासाठी तर पक्षाने सद्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली 'महाजन' फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक जळगाव महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. आता धुळ्यातही याच फार्म्युल्याची कसोटी आहे. सध्या भाजपचे तीन नगरसेवक आहेत, त्याचे 53 होणार काय? याचीच आता प्रतिक्षा आहे. 

जळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणूकीच्या यशासाठी तर पक्षाने सद्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली 'महाजन' फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक जळगाव महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. आता धुळ्यातही याच फार्म्युल्याची कसोटी आहे. सध्या भाजपचे तीन नगरसेवक आहेत, त्याचे 53 होणार काय? याचीच आता प्रतिक्षा आहे. 

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फारसे यश मिळत नव्हते. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे जेमतेम नगरसेवक निवडून येत होते. मात्र राज्यात पक्षाची सत्ता आल्यानंतर त्यांनी 'एक वार्ड एक प्रभाग' असा नियम वगळून 'चार प्रभागाचा एक वार्ड' अशी रचना केली. सरळ लढतीत भाजपला कधीच फायदा झाला नाही, त्यांना समुह लढतीचा नेहमीच फायदा झाला आहे. सन 1997 मध्ये युती सरकार असतांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला हे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी राज्यात पुन्हा सत्ता आल्यावर महापालिका निवडणुकीत चार प्रभागाचा एक वार्ड अशी रचना केली. याचा त्यांना फायदा झाला. 

याशिवाय पक्षाने नाशिक महापालिकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली यशासाठी नवीन फॉर्म्युला वापरला विरोधी पक्षातील नगरसेवकांना भाजपत थेट प्रवेश देवून त्यांना उमेदवारीही दिली. नाशिक महापालिकेत भाजपचे सोळाच नगरसेवक होते. मात्र निवडणुकीत त्यांनी मनसेच्या 21तर राष्ट्रवादीच्या तेरा नगरसेवकांना भाजपत प्रवेश दिला, तसेच याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेतले. त्यांना उमेदवारीही दिली, त्याच बळावर भाजपने तब्बल 66 नगरसेवक निवडून आणत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकविला. 
पुढे जळगाव महापालिका निवडणूकीतही हाच फॉम्युला वापरला. या ठिकाणीही जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच नेतृत्व दिले. माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीच्या सोबत असलेल्या मनसेच्या अकरा नगरसेवकांना भाजपत प्रवेश दिला, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सात नगरसेवकांनाही पक्षात सामिल करून घेतले. तसेच खानदेश विकास आघाडीचेही आजी, माजी नगरसेवकांनीही भाजपत प्रवेश केला. त्याच बळावर तब्बल 57 नगरसेवक निवडून आणून हुकमी बहुमत मिळवित जळगाव महपालिकेवरही भाजप झेंडा फडकविला. 

नाशिक, जळगावात यश मिळाल्यानंतर भाजपने हाच 'महाजन फार्म्युला' धुळे महापालिकेत अंमलात आणला आहे. या ठिकाणीही गिरीश महाजन यांच्याकडेच नेतृत्व देण्यात आले आहे.या ठिकाणीही महाजन यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना तसेच पदाधिकाऱ्यांना भाजपत प्रवेश दिला आहे. त्यांना उमेदवारीही देण्यात येईल. धुळ्यात आता महापालिका निवडणूकीचे रणांगण सुरू झाले आहे. भाजपचा 'महाजन फार्म्युला' या ठिकाणी यशस्वी होणार काय? हे मात्र निवडणुकीच्या निकालातच दिसून येईल.

Web Title: After nashik, jalgaon successful election girish mahajan ready for dhule election test....


संबंधित बातम्या

Saam TV Live