रेमीडीसिव्हीरनंतर आता प्लाझ्माचाही होतोय काळाबाजार !

मंगेश गाडे
सोमवार, 19 एप्रिल 2021

काल सामाजिक कार्यकर्ते शिवम घोलप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आळेफाटा येथील एका खाजगी कोविड केंद्रात दोन प्लाझमाची सव्वीस हजार रुपयांना विक्री करणाऱ्या संगमनेर येथील एक एजंटला रंगेहाथ पकडले.

जुन्नर: रोज वाढणारी कोरोना Corona बाधित रुग्णांची संख्या आणि त्यासोबत वाढणारा मृत्युदर या मुळे ऑक्सिजन बेड Oxygen beds, व्हेंटिलेटर Ventilator, रेमडेसिव्हीर Remidicivir, ऑक्सिजनची टंचाई होत आहे.  या साठी जुन्नर तालुक्यातील रुग्णांचे नातेवाईक, प्रशासन आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चिंता वाढली आहे. आता इंजेक्शन पाठोपाठ प्लाझ्माचा Plazma  सुद्धा काळाबाजार सुरु झालेला आहे. After Remedicivir Injection Black Marketing of Plasma also Started 

साडेपाच हजार रुपये किंमतीचा प्लाझ्मा तब्बल तेरा हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दलालांची टोळी तालुक्यात सक्रीय झाली होती.  या महागड्या किमतीमुळे प्लाझ्माचे गरज असणारी सर्वसामान्य गरजू जनता हतबल झाली आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या हतबलतेचा फायदा काही डॉक्टर Doctors घेत असल्याचे चित्र उघडकीस आले आहे. डॉक्टर, प्लाझ्मा एजंट आणि रक्तपेढी अशी  काळाबाजार करणारी साखळी तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.

काल सामाजिक कार्यकर्ते शिवम घोलप Shivam Gholap आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आळेफाटा येथील एका खाजगी कोविड केंद्रात Covid Center दोन प्लाझमाची सव्वीस हजार रुपयांना विक्री करणाऱ्या संगमनेर येथील एक एजंटला रंगेहाथ पकडले. त्या एजन्टला पकडून  चांगलाच चोप दिला आहे. त्या नंतर जास्त घेतलेली १५ हजार रुपयांची रक्कम त्याने पुन्हा प्लाझ्मा खरेदी केलेल्या नातेवाईकांना परत दिली. या यंत्रणेवर वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. नाहीतर अडचणीच्या काळातही माणसांना लुटणाऱ्या माणसांचीच संख्या कोरोना प्रमाणे वाढत जाईल. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live