Video | रिटायर्डमेंटनंतर धोनी करणार कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय

साम टीव्ही
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

 

  • रिटायर्डमेंटनंतर धोनाची नवी इनिंग 
  • धोनी करणार कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय
  • मध्य प्रदेशात 2000 पिल्लांची ऑर्डर!
     

रिटायर्डमेंट नंतर कॅप्टन कुल धोनी काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता त्याचं उत्तर मिळालंय. धोनी आता कुक्कटपालनाचा व्यवसाय करणार आहे. 

 

आतापर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवणारा कॅप्टन कुल धोनी आता कुक्कटपालनाच्या व्यवसायात उतरणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये  धोनी कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. त्यानं मध्य प्रदेशातील एका पोल्ट्री फॉर्मला 2000 पिल्लांची ऑर्डर दिल्याचंही समजतंय

कडकनाथ म्हणजे काय?
कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. मध्य प्रदेशच्या भीमांचल परिसरातील आदिवासीबहुल झबुआ जिल्ह्यात ही प्रजाती आढळते. या कोंबड्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात, यामध्ये प्रथिनांचं प्रमाणही जास्त असतं. तर कोलेस्ट्रोलही कमी असतं. शिवाय इतर कोंबड्यांच्या तुलनेत चरबीही कमी असते. 

लॉकडाऊनच्या काळात शेतात घाम गाळतानाचा धोनीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता तो पोल्ट्री व्यवसायात उतरलाय. धोनीची ही नवी इनिंग क्रिकेटच्या मैदानातील इनिंग प्रमाणेचं धडाकेबाज असेल हे नक्की 


संबंधित बातम्या

Saam TV Live