भंडारा जिल्ह्यात आज १३४९ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 4 मे 2021

राज्यातील भंडारा जिल्ह्यात आज परत विक्रमी १३४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे.

भंडारा:   जिल्यात लॉकडाऊनमुळे Lockdown कोरोना जरा स्थिरावला आहे. रुग्ण वाढीपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील भंडारा जिल्ह्यात आज परत विक्रमी १३४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. आज जिल्ह्यात ५७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. Again the corona patients number decreased in bhandara 

सलग १८ दिवसानंतर आज कोरोना Corona वाढीने उसंत घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हाती आलेल्या अहवाला नुसार आज तब्बल ५७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. सोबत मृत्युच्या वेग Death rate ही कमी झाला असून 15 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर सद्य भंडारा जिल्ह्यात ९ हजार १७ रुग्ण एक्टीव्ह Active Cases असून सर्वात जास्त रुग्ण हे भंडारा तालुक्यातील आहेत. 

हे देखील पहा - 

आता पर्यंत जिल्ह्यात ५३ हजार १२६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आणि ४३ हजार २०४ रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. तर ९०५ लोकांचा कोरोना मुळे मृत्यु झाला आहे. Again the corona patients number decreased in bhandara 

जिद्दीच्या जोरावर 98 वर्षेच्या आजींने केली कोरोनावर मात

वरठी Varthi येथे जम्बो कोविड हॉस्पिटल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट Oxygen Plant तयार होऊन कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्याची घटनाऱ्या रुग्ण संख्येची दखल केंद्रीय आरोग्य सचिव सह महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope  यांनी सुद्धा घेतली आहे. 

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live