अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असावं; शिवसेनेचं भाजपला अल्ल्टिमेटम !

अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असावं; शिवसेनेचं भाजपला अल्ल्टिमेटम !

सर्वप्रथम आमची मुख्यमंत्री पदाची मागणी होती. अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. दरम्यान काही कारणास्तव 144 -144 जागांवर आम्ही लढलो नाही. मात्र अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली होती. आता भाजपने आता आम्हाला  याबद्दल लेखी कळवावं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आपला निर्णय घेतील असं सेना  प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.  

शिवसेनेच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. सर्वप्रथम आमची मुख्यमंत्रीपदाची मागणी होती. लोकसभे दरम्यान अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. दरम्यान काही कारणास्तव 144 -144 जागांवर आम्ही लढलो नाही. अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची चर्चा देखील झाली होती. आता भाजपने आम्हाला याबद्दल लेखी कळवावं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आपला निर्णय घेतील असं भाजप आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेना आता मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झालेली पहायला मिळतेय.

शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. सत्ता स्थापनेबाबत आमदारांचा कल उद्धव ठाकरे जाणून घेतला. या बैठकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उपस्थित सर्व उमेदवारांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत 'साहेब तुम्हीच व्हा आता मुख्यमंत्री' अशा भावना व्यक्त केल्यात. दरम्यान आता शिवसेनेचे आक्रमक रूप आता पहायला मिळतंय.   
निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग आलाय. या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्याने यंदाच्या सत्तेत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे .

काँग्रेसचा प्रस्ताव 
या अस्थिर परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आल्यास जरूर विचार करू, असे स्पष्ट केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेत आम्ही लक्ष घातलेलं नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा कौल दिल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आता भाजपच्या एककेंद्री राजकारणाला बळी पडणार नसल्याचे संकेत दिल्याने सत्तेची नवी समीकरणे पुढे येऊ शकतात. 

उद्धव ठाकरेंशी शहा चर्चा करणार 
राज्यामध्ये भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापूर्वी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धच ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. शिवसेनेला सत्तेत अधिक झुकते माप देऊन हा तिढा सोडविण्याचा शहा यांचा विचार आहे; पण शिवेसना यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Web Title: aggressive shivsena demands cm post for two and half years

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com