थाळी वाजवून प्रहारचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

akola andolan
akola andolan

अकोला-  केंद्र शासनाच central government तूर आयात करण्याचं धोरण चुकीचं असल्याचं म्हणत अकोल्यातील सिटी कोतवाली चौकात बच्चू कडू Bachchu Kadu प्रणित प्रहार जनशक्ती Pranit Prahar Janshakti पक्षातर्फे ताली आणि थाळी बाजाव आंदोलन Andolan करण्यात आले. आपल्या देशात तुरीचा मोठया प्रमाणात साठा असताना दुसऱ्या देशातून तुरीची आयात कशा साठी असा सवाल प्रहार कार्यकर्त्यांनी विचारला आहे. An agitation against the central government

दरम्यान ज्याप्रमाणे थाळी वाजवून कोरोना जातो त्याचप्रमाणे थाळी वाजवून आयात थांबवा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासना विरोधात जोरदार नारेबाजी करत, निदर्शसने केली. आधीच कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं.

हे देखील पहा - 

अशात आता केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे. केंद्र सरकारचे आयात धोरण हे शेतकरी विरोधी असून या सरकारने आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांच्या विरोधातच निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. An agitation against the central government

एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या आवाहनाला प्रहार कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत आज राज्यभर केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले. आंदोलनानंतर  सिटी कोतवाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. प्रहारचे मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com