कोरोनाच्या संकटात अमेरिकेत आंदोलनांचा वणवा, पुन्हा वर्णभेदाची ठिणगी

साम टीव्ही
रविवार, 31 मे 2020
  • कोरोनाच्या संकटात अमेरिकेत आंदोलनांचा वणवा
  • अमेरिकेत पुन्हा वर्णभेदाची ठिणगी
  • अमेरिकेत 25 पेक्षा जास्त शहरांत आंदोलनांचा भडका

 

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना अमेरिकेत मात्र आंदोलनांचा भडका उडालाय. कोरोनाचं संकट आणि आंदोलनांची डोकेदुखी अशा दुहेरी कात्रीत अमेरिका अडकलीय.

संपूर्ण जग कोरोनाच्या संकाटाशी लढत असताना तिकडे अमेरिकेत मात्र नवा वणवा पेटलाय. असला तसला वणवा नाही, तर हा वणवा आहे अमेरिकेत कायमच वादाचा विषय ठरलेल्या वर्णभेदाचा. संपूर्ण अमेरिकेत आंदोलनांचा भडका उडालाय. या आंदोलनांचा कळीचा मुद्दा आहे वर्णभेद. अर्थात काळे-गोरे वाद. हे आंदोलन इतकं पेटलंय की तब्बल 25 शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. अमेरिकेतल्या ऐतिहासिक कोर्टाचीही इमारत आंदोलकांनी जाळून टाकलीय.

का उडाला अमेरिकेत आंदोलनांचा भडका?
अमेरिकेत गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस कोडीत एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यू झालेला आरोपी हा काळ्या रंगाचा होता. त्याच्या समर्थनार्थ अमेरिकेत ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झालीयत. न्यूयार्क, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टनमध्ये हे आंदोलन तीव्र झालंय. त्याचसोबत मिन्नेसोटा, जॉर्जिया या राज्यांत आणीबाणी जाहीर झालीय.

संपूर्ण जगात कोरोनाचा हाहा:कार उडालाय. त्यामुळे जगातले सगळे देश कोरोनाविरोधात लढतायत. अमेरिकेसमोर मात्र कोरोनाच्या संकटासोबतच या आंदोलनांचीही मोठी डोकेदुखी उभी राहिलीय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live