जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार; अतुल खुपसे पाटील यांचा इशारा

सोलापूर
सोलापूर

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात Politics उजनीच्या Ujani पाण्यावरून Water चांगलेच राजकारण तापले आहे. 22 एप्रिल रोजी सोलापूर Solapur जिल्ह्यातील उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला Indapur वळवण्याच्या निर्णयाला राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी स्थगिती देऊन तो आदेश रद्द केला असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले गेले.  Agitation In Front Of Jayant Patil's House; Atul Khupse Patil's Warning

 हे देखील पहा -

मात्र आज तीन दिवस उलटून गेले तरी याबाबत अजून कुठलाच अध्यादेश निघाला नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील लोकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत  25 मे पर्यंत हा निर्णय रद्द झाल्याचा अध्यादेश नाही निघाला तर राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन Agitation करणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे. 

22 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील हक्काच्या उजनी जलाशयातील पाणी 'सांडपाणी' या गोंडस शब्दाचा वापर करून बारामतीकरांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविले. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आक्रमक झाले आणि जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला. Agitation In Front Of Jayant Patil's House; Atul Khupse Patil's Warning

शेतकऱ्यांच्या व शेतकरी नेत्यांच्या आक्रमकपणामुळे व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी भविष्यात पूर्णपणे नष्ट होईल या भीतीने बारामतीकरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर इंदापूर ला पाणी नेण्याचा आदेश रद्द केल्याचे सांगितले.

मात्र मंत्री जयंत पाटील यांनी ते वक्तव्य करून जवळपास तीन दिवस उलटले आहेत. तरीही याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही. लवकरात लवकर अध्यादेश काढा नाहीतर सोलापूर जिल्ह्यातील गावागावात आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा देखील अतुल खूपसे-पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिला आहे. Agitation In Front Of Jayant Patil's House; Atul Khupse Patil's Warning

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com