धान उत्पादक शेतकऱ्यांचा खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृवात मोर्चा 

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 1 जून 2021

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी ला घेऊन भाजपाने BJP साकोली Sakoli तहसिल कार्यालयावर धड़क मोर्चाचे आयोजन केले असून खासदार MP सुनील मेंढे Sunil Mendhe यांनी स्वतः बैलगाडी हाकत या मोर्च्याचे नेतृत्व केले आहे. 

भंडारा: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी ला घेऊन भाजपाने BJP साकोली Sakoli तहसिल कार्यालयावर धड़क मोर्चाचे Agitation आयोजन केले असून खासदार MP सुनील मेंढे Sunil Mendhe यांनी स्वतः बैलगाडी हाकत या मोर्च्याचे नेतृत्व केले आहे. 

शेतक-यांना Farmers त्वरित न्याय द्या,  धान्य मोजणी त्वरीत सुरू करा, बोनस द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. होमगार्ड परेड ग्राऊंडवरून सुरू झालेल्या आंदोलनात Agitation चक्क शेतक-यांनी बैलगाडी व ट्रैक्टरच्या मोर्चासह आंदोलन करीत तहसिल कार्यालयावर धडकले. यावेळी असंख्य शेतकरी या आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी स्वतः बैलगाडी हाकत ह्या मोर्च्याचे नेतृत्व केले आहे. 

मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या....

कोरोना Corona काळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे लागते, ही गोष्टच दुर्दैवाची आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगत त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम महा आघाडीचे Maha Vikas Aghadi सरकार करीत आहे. हे राज्यकर्त्यांचे ढोंग असल्याची टीका खासदार मेंढे यांनी केली. 

हे देखील पहा 

भाजपा न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहील, असे स्पष्ट संकेत खासदार सुनील मेंढे यांनी साकोली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात दिले आहे. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे आजी माजी आमदार उपस्थित होते.  

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live