राष्ट्रवादीच्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्याच नेत्यांची दांडी !

विकास मिरगणे
शनिवार, 22 मे 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत शहराच्या वतीने केंद्र सरकारविरोधात पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड उपस्थित असताना सुद्धा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहरातील नेते, पदाधिकारी व नगरसेवक यांनी दांडी मारली आहे. 

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP कर्जत Karjat शहराच्या वतीने केंद्र सरकारविरोधात Central Government पेट्रोल Petrol डिझेल Diesel दरवाढ Price Increase तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन Agitation करण्यात आले. Agitation By NCP Karjat City 

मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड Suresh Lad उपस्थित असताना सुद्धा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहरातील नेते, पदाधिकारी व नगरसेवक यांनी दांडी मारली आहे.

हे देखील पहा -

आंदोलन सुरू असताना पक्षातीलच अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उशिरा येत या आंदोलनाला हजेरी लावली. राज्यात कोरोनाची लाट जरी असली तरी सोशल डिस्टंसींगच्या नियमांचे पालन करत राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात मोदी सरकार विरोधात आंदोलन केल्याचे दिसून येत आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यामध्ये काही मोजक्याच कार्यकर्त्यांमध्ये आंदोलन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती असतानासुद्धा राष्ट्रवादीचे नेते कर्जत मध्ये कोठेच दिसून येत नाहीत. कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मरगळ आली आहे.  पक्षांतर्गत असलेली गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. Agitation By NCP Karjat City 

पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत मात्र त्यांच्याकडे कोणतीच जबाबदारी दिली जात नाही तसेच दुर्लक्षित करण्यात येत आहे. तसेच जे लोक पक्षात राहून पक्षाविरुद्ध काम करतात त्यांच्याकडेच जबाबदारी दिली जात आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या वाजत ऐकायला मिळत आहे. 

राजगुरुनगरमध्ये बेकायदेशीर देशी दारु अड्ड्यावर पोलीसांचा छापा

त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर  अन्याय होतोय ही भावना तरुण कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.  त्यामुळेच तरुण कार्यकर्ते आंदोलनाला दांडी मारताना दिसून येत आहेत. Agitation By NCP Karjat City 

अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पदाला चिटकून बसले आहेत व नवतरुणांना पक्षात संधी भेटत नसल्याची ओरड कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live