राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांच्या खुर्चीला शाल, श्रीफळाचा आहेर .

विश्वभूषण लिमये
शनिवार, 27 मार्च 2021

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी गावातून जाणाऱ्या सोलापूर-पुणे महामार्गाचे काम तब्बल पाच वर्षापासून तसेच रखडलेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या टेंभुर्णीवासीयांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फक्त अठरा तासात 25 किलोमीटर रस्ता पूर्ण करत रस्ते निर्मीतीचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. मात्र दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी गावातून जाणाऱ्या सोलापूर-पुणे महामार्गाचे काम तब्बल पाच वर्षापासून तसेच रखडलेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या टेंभुर्णीवासीयांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.(Agitation at National Highway Authority office at Solapur District)   

विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कार्यालयात उपस्थित नव्हते. त्याचवेळी टेंभुर्णीमधील शिवसेना, रयतक्रांती तसेच स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आहे. 

26 मार्च 2016 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या तब्बल 25 ते 30 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. (Agitation at National Highway Authority office at Solapur District)

त्यावेळच्या कार्यक्रमपत्रिकेत टेंभुर्णीतील रस्त्याच्या चौपदरीकाचा देखील समावेश होता मात्र मागील पाच वर्षात या रस्त्यावरील एकही दगड हालवलेला गेला नाही. त्यामुळे हा खराब झालेला रास्ता वापरत असताना टेंभुर्णी वासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. 

या रस्त्यासाठी तब्बल 101 कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली होती मात्र अद्यापही काम पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी आज आपला संताप व्यक्त करत गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. 

दरम्यान प्रकल्प संचालकांना याबाबत विचारले असता, त्यांनी कामासाठी दिरंगाई झाल्याचे कबूल केले. मात्र लवकरात लवकर या खराब रस्त्याचे पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live