बंगळुरूच्या कृषी मेळाव्यात 1 कोटीचा बैल; बैलाचे विर्य विकते हजारात

मालकाने पुढे बोलताना सांगितले की या बैलाच्या जातीच्या वीर्याला 'जास्त मागणी' आहे आणि त्याचा एक डोस..
बंगळुरूच्या कृषी मेळाव्यात 1 कोटीचा बैल; बैलाचे विर्य विकते हजारात
बंगळुरूच्या कृषी मेळाव्यात 1 कोटीचा बैल; बैलाचे विर्य विकते हजारातTwitter/ @ANI

बंगळुरु: बैल हा शेतकऱ्याचा शेती कामातील साथीदार मानला जातो. कितीही संकटं आली तरी बैल आपल्या मालकाला कामात मदत करत राहतो आणि शेतीतून फायदा देत राहतो. परंतु तिकडे बंगळुरुमध्ये बैलाने आपल्या मालकाला एका दुसऱ्या कामासाठी मालामाल केले आहे. कृष्णा नावाचा साडेतीन वर्षांचा बैल, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे, या वर्षीच्या बंगळुरू येथे झालेल्या कृषी मेळाव्यात बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. बैलाचे मालक असलेले बोरेगौडा म्हणाले की, हा बैल ‘हल्लीकर’ जातीचा आहे, ज्याला “सर्व पशु जातींची माता” मानली जाते. मालकाने पुढे बोलताना सांगितले की या बैलाच्या जातीच्या वीर्याला 'जास्त मागणी' आहे आणि त्याचा एक डोस 1,000 रुपयापर्यंत विकला जातो.

या वर्षीच्या कृषी मेळ्यासाठी १२,००० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी अनेकांनी घटनास्थळी नोंदणी केली आहे. यामध्ये तब्बल 550 स्टॉल्स आहेत ज्यात गुरेढोरे, सागरी आणि कुक्कुटपालन व्यतिरिक्त पारंपारिक आणि संकरित पीक प्रकार, तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री प्रदर्शित करण्यात आली आहे.

यावर्षीच्या कृषी मेळ्यातील स्टॉल्सचा उद्देश बियाणे, रोपे आणि पोल्ट्री विक्री हा आहे. या वर्षीचा चार दिवसीय कृषी मेळाव्याते उद्घाटन विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अनुपस्थितीत शुक्रवारी एका आदिवासी महिलेने आधुनिक शेतकरी बनून त्याचे केले. कृषी विज्ञान विद्यापीठाने आयोजित केलेल्या मेळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात, प्रेमदासप्पा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com