२५ लाखांचे विनापरवाना बिटी बियाणे जप्त; कृषी विभागाची कारवाई

जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेले बियाणे येत आहे
कृषी
कृषी प्रसाद नायगावकर

यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेले बियाणे येत आहे. अमरावती Amravati जिल्ह्यातून कळंब Kalamb येथे जात असलेल्या ‘बीटी’ ची पाकीट कृषी विभागाने Department of Agriculture जप्त केले आहे. ही कारवाई यवतमाळ Yavatmal- कळंब मार्गावर केली आहे. 25 lakh unlicensed BT seeds seized

एका कृझर मध्ये ही तस्करी होत होती. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या farmers नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. दमदार पाऊस झाल्यानंतर दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. चांगला पाऊस Rain झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची जवळपास सर्व तयारी केली आहे.

हे देखील पहा

कृषी विभागाने शेतकर्‍यांची अडवणूक होऊ नये, म्हणून तयारी केली आहे. जिल्ह्यात यंदा साडेनऊ लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यातमध्ये सर्वाधिक ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाणार आहे. २ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 25 lakh unlicensed BT seeds seized

पेरणीसाठी शेतकर्‍यांना आवश्यक असलेले बी- बियाणे, खतांचा साठा करणे, कृषी विभागाने सुरू केलेल आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असलेले, बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचले जात आहे, असे असले तरी परवानगी नसलेले, बियाणेही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत. अमरावती वरुन ‘बीटी’ ची मोठी खेप येत होती.

कृषी
अलिशान बंगल्यातील दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई...

कृषी विभागाने हा साठा जप्त केल आहे. यासंदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य निलेश ढाकुलकर, राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दतात्रय आवारे आदी उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com