३८ हजार मेट्रिक टन खत शिल्लक; ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार

मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार आहे. पेरणीसाठी घरगुती व बाजार पेठेत मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यात आज घडीला ३८ हजार मेट्रीक टन खत पेरणीसाठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी (Farmer) मशागतीची तयारी पूर्ण केली आसून यावर्षी जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार आहे.

यात सर्वाधिक ४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार आहे. त्यासाठी ३ लाख ४५ हजार क्विंटल बियाणे लागते. यावर्षी कृषि ४ लाख ७२ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी उपलब्ध आहे. तसेच विविध कंपण्यांचे १ लाख २० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यात महाबिजचे ६ हजार ५०० क्विंटल तर इतर खाजगी कंपन्यांचे ९७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. या बियाणापैकी ४५ हजार क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे.

हे देखील पाहा -

खरीप हंगामासाठी दरवर्षी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ८७ मेट्रीक टन खताचा वापर होतो. मार्च अखेर जिल्हयात २६ हजार ७०० मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक असल्याने १ लाख ५३ हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हयासाठी १ लाख ९ हजार ९०० मेट्रीक टन खताचे अवंटन मंजूर केले. एप्रिल पासून आज पर्यंत ६९ हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध झाला असून त्यापैकी ३१ हजार मेट्रीक टन खाताची विक्री होऊन जिल्ह्यात ३८ हजार मेट्रीक टन खत साठा शिल्लक आहे.

Latur News
करणवीर बोहरा याच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

यात डीएपी ६७० मेट्रीक टन आहे. तसेच जून अखेर पर्यंत १४ हजार ६८८ मेट्रीक टन डीएपी येणार असून आजपर्यंत ७ हजार ५८५ मेट्रीक टन खत आला आहे. त्यापैकी ६ हजार मेट्रीक टन डीएपी विक्री झाला आहे. तर २ हजार मेट्रीक टन खत साठा शिल्लक आहे. तसेच राखून ठेवलेला १ हजार १६८ मेट्रीक टन डीएपीचा बफर स्टॉकही गरजेनुसार त्या-त्या तालुक्यात पाठण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com