कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील 400 एकर जमीन पाण्याखाली; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान!
कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील 400 एकर जमीन पाण्याखाली; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान!विजय पाटील

कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील 400 एकर जमीन पाण्याखाली; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान!

पाणी सोडण्याचे बंद न केल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये (Jat Taluka) कॅनॉलला अचानक पाणी सोडल्याने 300 ते 400 एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. केळी बागा, डाळिंब बागा, ऊस, उडीद, तूर, बाजरी, मूग, भुईमूग ही पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers Loss) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(400 acres of land submerged by the release of canal water Losses to farmers)

हे देखील पहा-

कॅनॉलची खोदकाम व्यवस्थित न करता तसेच प्लास्टरही न करता केवळ ग्रामपंचायत निवडणुका (Elections) डोळ्यासमोर ठेऊन पाणी सोडले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मार्च, एप्रिल, मे मध्ये सोडलेल्या पाणी आणि पावसाळ्यात सोडलेले पाणी हे सर्व पाणी सनमडी,(Sanmadi) घोलेश्वर,(gholeshvar) मायथळ (Maythal) येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसले आहे. यामुळे चालू हंगामात जमिनीची मशागत करता आली नाही त्यामुळे पीक वाया गेले आणि ज्या जमिनीत मशागत करता आली पिके घेतली होती ती सर्व पिके काढायला आली आसताना पुन्हा कॅनॉलला पाणी सोडून हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे काम आता चालू आहे. उभ्या पिकात पाणी गेल्याने शेतकरी प्रचंड निराश झाले आहेत. या भागातील 300-400 एकर जमीन पाण्याखाली आहे. यामध्ये केळी, डाळिंब, ऊस, उडीद, तूर, बाजरी, मूग, भुईमूग ही पिके जमीनदोस्त झाली आहेत तर जाण्या-येण्यासाठी असलेला रस्ताही कॅमॉलच्या पाण्याने वाहून गेला आहे.

कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील 400 एकर जमीन पाण्याखाली; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान!
पलूसमध्ये पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी भाजपचा धडक मोर्चा; हजारो पुरग्रस्त रस्त्यावर

प्रांताधिकारी प्रशांत आवटी (Prantadhikari Prashant Avati) यांना महिन्याभरपूर्वी लेखी निवेदन दिले होते तरीही रविवारी रात्री अचानक कॅनॉलला पाणी सोडल्याने काढलेले उडीद वाहून गेले आहे ऊस, केळी, भुईमूग, बाजरी, मूग, डाळिंबची बाग जमीनदोस्त झाल्या आहेत. ह्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच कॅनॉल चे काम जो पर्यंत पूर्ण होत नाही तोंपर्यंत पाणी सोडू नये. कॅनॉल चे काम पूर्ण झाल्यावर कुशल पाणी पुढे न्यावे त्याला आमचा विरोध नसल्याचे येथील शेतकरी दामाजी पवार यांनी सांगितले. पाणी सोडण्याचे बंद न केल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com