7/12बाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

7/12बाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
सात-बारा उतारा

अहमदनगर: अॉनलाईन सात-बारा उताऱ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. तलाठी कार्यालयात जाण्यासाठी मारावे लागतात, त्यापासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मात्र, हे सात-बारा उतारे अॉनलाईन करताना काही गंभीर चुका झाल्या आहेत. त्याबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिक कार्यक्रमांतर्गत सात बारा संगणकीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे. परंतु संगणकीकृत 7/12 मध्ये काही चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदन अथवा तक्रारी शासनाकडे, जमाबंदी, आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत.

सात-बारा उतारा
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

अनेक खातेदार ई-मेल व्दारे किंवा दूरध्वनीव्दारे अडचणी मांडतात. काही खातेदार ई हक्क प्रणालीव्दारे 7/12 मधील दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतात. आता हा प्रकल्प अंतिम टप्यात असताना 100 टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सर्व नागरिकांनी तलाठी कार्यालयात, तसेच स्मार्टफोन मोबाईलमध्ये ही https://bhulkeh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला जाऊन आपला सातबारा अचूक आहे. हे तपासून घ्यावे. 7/12 संगणकीकरणाची अचूकता 100 टक्के साध्य करण्यासाठी तसेच ई-फेरफार प्रणालीत निदर्शनास न येणा-या काही त्रुटी, चुका खातेदार निदर्शनास आणूत देत असतील तर त्यासाठी चुक दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे आणि त्याप्रमाणे तहसीलदार यांचे कलम 155 खाली आदेश काढून 7/12 दुरुस्त करण्यासाठी कार्यालयीन वेळेत अहमदनगर जिल्हयातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये, प्रत्येक महसुली गावांमध्ये शिबीराचे आयोजन केले आहे. सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा व संबंधित तलाठी, मंडळअधिकारी, तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com