तासगावमध्ये थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या तासगावमधील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी खासदारांना चांगलेच धारेवर धरले.
तासगावमध्ये थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
सांगलीत थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन विजय पाटील

सांगली : शेतकऱ्यांचे ऊस बिल मिळावे या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.

हे देखील पहा -

भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांचे ऊस बिल अद्यापही दिलेले नाही. अनेक वेळा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. खासदार संजय काका पाटील यांनी ऊस बिल लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते. पण अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत.

सांगलीत थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तासगाव मध्ये भव्य अश्या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चा दरम्यान पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावला होता. यावेळी आंदोलन ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी येऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना पाटील म्हणाले, कारखान्याची नवीन सुरवात केली मात्र साखरेची विक्री न झाल्याने साखर पडून राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांना बिल देणे अवघड झाले आहे. काही बँकेत कर्जासाठी प्रकरणे दिली आहेत. येत्या 15 दिवसांत शेतकऱ्यांना त्यांची रक्कम दिली जाईल.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com