
चेतन व्यास, साम टिव्ही
Agriculture News : शेतात गवत कापणीचे काम करीत असलेल्या शेतकऱ्याच्या (Farmer) डाव्या हाताला अचानक घोणसअळी (स्लज कॅटरपिलर) या अळीचा स्पर्श होताच, अवघ्या काही सेकंदातच शेतकऱ्याच्या संपूर्ण शरीरात असह्य वेदना सुरु झाल्या. त्यांनी तत्काळ भिडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधार आली. ही घटना देवळी तालुक्यातील (Wardha) भिडी गावात घडली. घोणसअळीमुळे शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे मात्र तितकेच खरे. (Wardha News Today)
नेमकं काय घडलं?
भिडी येथील शेतकरी रंगराव होले यांचे भांडापूर शिवारात शेत आहे. ते १६ रोजी शेतात गवत कापण्याचे (Agriculture) काम करीत असताना त्याना घोणसळीचा स्पर्श झाला आणि काही सेकंदाच वेदना होऊ लागल्या. असाच प्रकार १५ रोजी तळणी खंडेराव येथील एका शेताकऱ्यासोबतही घडला होता. त्या शेतकऱ्याला सावंगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
दोघेही शेतकरी शेतातील गवत कापत असताना त्यांना घोणसळीचा स्पर्श झाला. यानंतर दोन्ही शेतकऱ्यांना तीव्र स्वरुपाच्या वेदना, खाज आली. विंचू चावल्यानंतर जो वैद्यकीय उपचार करतात तशाच प्रकारची उपचार पद्धती वापरण्यात येते. या अळीमुळे मानवी जीवीताला धोका नाही, पण, योग्य उपचार वेळेत करण्याची आवश्यकता आहे. (Agriculture News Today)
घोणसअळी कशी असते?
ही अळी विषारी असून ब्लेड सारखी काटेरी असते, तिचा रंग पिवळा हिरवा असतो. घोणसअळीने चाव्याने तसेच स्पर्शाने अंग बधीर होते मात्र उपचार केल्यावर बरे होतात. तिचे वैज्ञानिक नाव ‘स्लज कॅटरपिलर’ असे आहे. पण शेतकरी त्याला घोणसळी म्हणतात. ग्रामीण भागात पानविंचू देखील या अळीला संबोधतात.
घोणसअळी कुठे आढळले?
घोणसळी प्रामुख्याने घरासमोरील शोभीवंत झाडे, शेतातील गवत, बांधावरील गवत तसेच उसाच्या फडात जास्त प्रमाणात आढळून येते. मानवी जिवीताला या अळीचा धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. तसेच अळीने शरिरात सोडलेले काटे काढण्याचा प्रयत्न करावा, शेतात काम करत असताना चपलांऐवजी बुट घालावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.