Agriculture News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या १५ दिवसांत खात्यावर जमा होणार 'इतकी' रक्कम

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
Agriculture News
Agriculture News Saam TV

Agriculture News : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) आनंदाची बातमी आहे. येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Agriculture News) हे अनुदान मिळणार आहे. राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल.

Agriculture News
Nashik CNG Price : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही CNG दरात वाढ

अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या २८ लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी बॅंकांनी दिलेल्या याद्यांची छाननी आता पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिध्द होऊन त्याचे चावडी वाचन होईल. त्यानंतर १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. दरम्यान याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय पुढच्या कॅबिनेट मिटींगमध्ये काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला होता.

२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ दिला जाणार आहे. कृषी विभाग व बॅंकांकडून प्राप्त याद्यांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम याद्या जाहीर करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com