कृषी अधिकाऱ्यांचा बोगसगिरी करणाऱ्या कृषी दुकानदारांना दणका; दोघांचे परवाने निलंबित

बोगसगिरी करणारांची गय केली जाणार नाही - कृषी अधिकारी जेजुरकर
कृषी अधिकाऱ्यांचा बोगसगिरी करणाऱ्या कृषी दुकानदारांना दणका; दोघांचे परवाने निलंबित
Beed NewsSaam Tv

बीड - दरवर्षी बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची (Farmer) आर्थिक लूट करण्याचे काम काही महाभाग कृषी दुकानदारांकडून केले जाते. तर यावर्षी मात्र जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर यांनी अशा बोगसगिरी करणाऱ्या दुकानदारांना चाप बसवण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 3 कृषी दुकानाचे परवाने रद्द करत 2 कृषी दुकानाचे परवाने निलंबित (Suspended) केले होते. तर आता पुन्हा एकदा बोगस बियाणे, बोगस खत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन कृषी दुकानांचा परवाना निलंबित केला आहे.

हे देखील पाहा -

बीडच्या माजलगाव शहरात असणारे सुमित ॲग्रो एजन्सी, या कृषी दुकानात बियाणांची भेसळ करत बोगसगिरी केली जात होती. यावेळी भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकत या कृषी दुकानावर कारवाई केलीय. तर बीडमध्ये देखील एका दुकानात खताची बोगसगिरी केली जात होती. या दरम्यान या दुकानावर देखील कारवाई करत, दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित केला आहे.

Beed News
मतदार यादीशी आधार कार्ड जोडलं जाणार; निवडणुकांसंबंधात केंद्र सरकारचे 'चार' मोठे निर्णय

दरम्यान जर शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी संपर्क करून, आपली तक्रार नोंदवावी. असे आवाहन कृषी अधिकारी जेजुरकर यांनी केले आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात बियाणांची बोगसगिरी, खतांची बोगसगिरी, बियाणे-खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, 12 पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जर जास्त दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर, बोगसगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा इशारा जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर यांनी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com