पावसामुळे शेती बरबाद, हवालदिल तरुणानं संपवलं जीवन

तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
पावसामुळे शेती बरबाद, हवालदिल तरुणानं संपवलं जीवन
पावसामुळे शेती बरबाद, हवालदिल तरुणानं संपवलं जीवन लक्ष्मण सोळुंके

जालना - महाराष्ट्रात Maharashtra मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी राज्यभर मोठ्या संख्येनं आंदोलन केली होती. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षणही जाहीर करण्यात आलं होतं. पण अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवलं आहे. त्यामुळे अनेक मराठा तरुणांच्या पदरी निराशा आली आहे.

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावी ओलादुष्काळ असल्यानं शेतीचं नुकसान झालं आणि मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हवालदिल तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा -

सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील रहिवासी आहे. मृत सदाशिव हा मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्यानं इलेक्ट्रीशनचा कोर्सही केला होता. मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी सदाशिव आपल्या गावाकडे येणोरा येथे आला होता.

पावसामुळे शेती बरबाद, हवालदिल तरुणानं संपवलं जीवन
आजपासून टोल वसुली; काम अपुर्ण असल्‍याचे सांगत राष्‍ट्रवादीचा विरोध

त्याला घरी चार एकर शेती आहे. मात्र गावाकडेही सतत पाऊस असल्यानं त्याला ओला दुष्काळाचा सामना करावा लागला. पावसाच्या पाण्यामुळे शेतातील पिकंही करपून गेली होती. एकीकडे नोकरी सोडली आणि दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्यानं सदाशिव आर्थिक विवंचनेत सापडला होता. यामुळे हवालदिल झालेल्या सदाशिवनं आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं आत्महत्येचा कारणांचा खुलासा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com