Tomato Price: टोमॅटोचे भाव गडगडले; भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Ahmednagar News : टोमॅटोचे भाव गडगडले; भाव नासल्याने शेतकरी हवालदील
Tomato Price
Tomato PriceSaam tv

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : गेल्या महिनाभरापर्यंत टमाट्याचे दर गगनाला भिडले होते. परंतु मागील काही दिवसापासून टमाट्याची (Tomato) आवक वाढली असून सध्या दर गडगडले आहेत. आता टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने (Farmer) शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुन्हा एकदा टमाटे फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Live Marathi News)

Tomato Price
Bhandara Accident News : ओव्हरटेक करताना ट्रकची धडक; कारमधील आठ प्रवासी जखमी

काही दिवसापूर्वी टोमॅटोने दराचा उच्चांक गाठला होता. या काळात टमाटे बाजारात दिसेनासे झाले होते. तर दर वाढल्याने स्वयंपाक घरातुन टमाटा देखील गायब झाला होता. मात्र आता उलट परीस्थीती झाली आहे. टोमॅटोला अगदी पन्नास पैसे ते दोन रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. 

Tomato Price
Beed Crime News: 'माझ्याशी लग्न कर' म्हणत शिवीगाळ करत मुलीची छेड; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

भाव नसल्याने गायीला टाकले टमाटे 

राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील सागर धांगट या होतकरू तरूण शेतकऱ्याने टमाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. आता टमाटे निघू लागले असताना, बाजारात कवलीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतातील टोमॅटोची गाईंना मेजवानी दिली. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com