अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफास

या शेतकऱ्याने सहा महिन्याच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण हरिचंद्र पिंपळकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफास
अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफासजयेश गावंडे

अकोला- बार्शीटाकळी तालुक्यातल्या सायखेड येथे एका अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली आहे. या शेतकऱ्याने सहा महिन्याच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण हरिचंद्र पिंपळकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. गळफास घेताना पत्नी व नातेवाईकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केली. परंतु त्यांना नारायणला वाचविण्यात यश आले नाही.(Akola Farmer Committed Suicide)

हे देखील पहा -

मृतकाचा भाऊ दिनेश पिंपळकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी गाठून पंचनामा केला. शेतकरी नारायण पिंपळकर याचे पश्चात आई, भाऊ,बहिणी, पत्नी, ५ वर्षाची मुलगी व सहा महिन्याचा चिमुकला आहे. दोन वर्षापूर्वी आई सुमनबाई यांच्या नावे असलेल्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाबा येथून घेतलेले पीक कर्ज थकित होते. त्यापैकी काही कर्ज माफ झाले.

अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफास
Nashik: लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न; तोतया निवृत्त मेजरसह एकाला अटक

त्यानंतर आईने शेतीवरील हक्कसोड करून दोन एकर शेती नारायण च्या नावे केली. तेव्हापासून सततची नापिकी, दुष्काळी स्थिती उद्भवल्याने नारायण हा पूर्वी आईच्या नावे असलेले ९६ हजार रुपये थकित कर्ज परतफेड करू शकला नाही आजही ते कर्ज थकीत राहिले .परिणामी मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.