अकोला बाजार समितीत सोयाबीन साडे आठ हजारांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे.
अकोला बाजार समितीत सोयाबीन साडे आठ हजारांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोला बाजार समितीत सोयाबीन साडे आठ हजारांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवितजयेश गावंडे

अकोला - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या अकोला बाजार समितीत सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. दिवाळीपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे.

हे देखील पहा -

उच्च दर्जाच्या बियाणांच्या सोयाबीनला ८ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे येत्यादिवसांमध्ये सोयाबीनची विक्रमी दरांकडे वाटचाल होणार असल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाने सोयाबीनचा दर्जा ढासळला असतानाही शेतकरी हा साठवणुकीवर भर देत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घट होती, पण आता दिवाळीनंतर बाजारपेठेतील चित्र बदलेले आहे. थोडी-थोडी करून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे.

अकोला बाजार समितीत सोयाबीन साडे आठ हजारांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
Pune: परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकार

सोयाबीनच्या दरात दररोज ५०-१०० रुपयांनी वाढ नोंदविली जात होती. आर्द्रतेचे परंतु, सोयाबीनला दिवाळीआधी समितीत ८ हजार रुपये प्रति क्विंटल आर्द्रतेचे दर मिळाला. मात्र, पावसाचा फटका दरांमध्ये बसलेल्या सोयाबीनला ६५००-७००० दर मिळत आहे. पुढील काळात आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com