
अकोला : गेल्या दोन महिन्यांपासून अकोल्यातील (Akola) सोयाबीन बाजार मंदीत असून दरात सातत्याने घट नोंदविली जात आहे. डिसेंबरमध्ये सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेलेले सोयाबीन (Soybean) आता पाच हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. दोनच महिन्यात सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे बाराशे ते तेराशे रुपयांची घसरण झाली. (Letest Marathi News)
दरवाढीच्या अपेक्षेने केली साठवणूक
यावर्षी सोयाबीनचे बाजारभाव सुरुवातीपासूनच दबावात आहे. त्यामुळे गतवर्षीनुसार दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा (farmer) अपेक्षाभंग होत असून, आता तर क्विंटलमागे १२०० ते १३०० रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीनच्या घसरत्या दराने शेतकऱ्यांत धाकधूक वाढली. दरम्यान, हंगामाच्या अंतिम टप्प्यात तसेच हंगामानंतर गतवर्षीप्रमाणे दर उसळी घेतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.