Shiv Sena: नुकसानीनंतरही पिक विमा मिळेना; शिवसेनेचे जिल्हाभरात रास्ता रोको

नुकसानीनंतरही पिक विमा मिळेना; शिवसेनेचे जिल्हाभरात रास्ता रोको
Shiv Sena Akola News
Shiv Sena Akola NewsSaam tv

अकोला : शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेले नुकसान व पिक विम्याची रक्कम महात्मा ज्योतीबा फुले प्रोत्साहनपर योजनेचे अनुदान तात्काळ द्यावे; या मागणीसाठी आज (Shiv Sena) शिवसेना (उध्दव ठाकरे गट) अकोला (Akola) जिल्हाभरात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. (Letest Marathi News)

Shiv Sena Akola News
Vinayak Raut: राज्यपालांच्या हकालपट्टीची पंतप्रधानांकडे मागणी; खासदार विनायक राऊत

अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे (Farmer) सततच्या पावसाने नुकसान झाल्याने त्यांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी. (Crop Insurance) पिक विमा अग्रीम २५ टक्के तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. महात्मा ज्योतीबा फुले प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे. पुरग्रस्तांचे व खरडून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा तात्काळ जमा करण्यात यावी. या मागण्यासाठी आज जिल्हाभरात ठिकठिकाणी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात रास्ता रोका आंदोलन करण्यात आले.

आर्थिक मदत तात्‍काळ द्या

शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com