Akola : धक्कादायक; अकरा महिन्यात 128 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या!

अकोल्यात अकरा महिन्याच्या कालावधीत 128 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Akola : धक्कादायक; अकरा महिन्यात 128 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या!
आत्महत्याSaam Tv

अकोला : नैसर्गिक संकट, उत्पादनात झालेली घट आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. अकोल्यात अकरा महिन्याच्या कालावधीत 128 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सततची नापिकी, उत्पादनात झालेली घट, नैसर्गिक संकटे अशा विविध कारणांमुळे नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

हे देखील पहा :

हाता-तोंडाला आलेला घास अस्मानी आणि सुलतानी संकटांनी हिरावून नेल्याने अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतीचं नुकसान झाल्यानंतर डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? या आर्थिक विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे.

अकोल्यात शेतकरी आत्महत्येच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीत सुमारे 128 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जानेवारी ते आजपर्यंत 128 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे.

आत्महत्या
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका करा : चंद्रशेखर आझाद
आत्महत्या
महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!

या आत्महत्या पैकी 68 शेतकरी आत्महत्या ह्या मदतीसाठी पात्र ठरल्या असून 11 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत.इतर आत्महत्या प्रकरणे प्रलंबित आहेत. 2020 या वर्षात तब्बल 155 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिलीय.

आत्महत्या
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video

कोरोनाच्या काळात सर्वाधिक आत्महत्या -

गेल्या दोन वर्षात म्हणजेच कोरोनाच्या काळात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

  1. 2019- 124 आत्महत्या

  2. 2020- 155 आत्महत्या

  3. 2021- 128 आत्महत्या ( नोव्हेंबर पर्यंत )

काळी आई कोपल्याने आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी आता तरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com