अमरावतीत खरीपाचे दशकातील सर्वाधिक 85 टक्के कर्जवाटप

यंदा खरीपाचे ८५ टक्के पीक कर्ज वाटप प्रशासनाचा दावा मात्र आकडेवारी खोटी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
अमरावतीत खरीपाचे दशकातील सर्वाधिक 85 टक्के कर्जवाटप
अमरावतीत खरीपाचे दशकातील सर्वाधिक 85 टक्के कर्जवाटपSaam TV

अमरावती: यंदाच्या खरीपात अमरावती जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ८५ टक्के कर्जवाटप आतापर्यत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यतचा उच्चांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ९८ टक्के वाटप केलेले असताना राष्ट्रीयीकृत बँका ७४ टक्क्यांवरच स्थिरावल्या आहेत. अशी आकडेवारी अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक यांनी जाहीर केल्यानंतर त्या टक्केवारी वर शेतकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे माहितीनूसार यंदाचे खरीप हंगामासाठी अमरावती जिल्ह्यातील बँकाना १२०१.११ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी आतापर्यत १०१५ कोटींचे पीक कर्जवाटप केलेले आहे.

अमरावतीत खरीपाचे दशकातील सर्वाधिक 85 टक्के कर्जवाटप
वाह रं शेतकरी! फक्त दोन बाय चार फुटात फुलवली भाजीपाल्याची शेती

एकूण लक्षांकाच्या ८५ टक्के इतके कर्जवाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. यापूर्वी २०१५-१६ चे हंगामात ६५ टक्क्यांपर्यत कर्जवाटप केले होते. त्यानंतर यंदा विक्रमी उच्चांकी कर्जवाटप असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने जाहीर केली. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातील कर्जवाटपाचा टक्का माघारला होता. मात्र, कर्जमाफीनंतर दीड लाखांपर्यत कर्ज झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला. या सर्व शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे. तसेच अजूनही कर्ज वाटप मुदत संपण्यासाठी १० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने संपूर्ण १०० टक्के लक्षांक गाठण्याचा मानस असल्याचं जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र झा यांनी सांगितलं.

मात्र जिल्हा अग्रणी बँकेने जाहीर केलेली पीक कर्ज वाटपाची आकडेवारीमध्ये तफावत असल्याची शेतकरी प्रकाश साबळे यांनी सनीतले तालुक्यातील बँकेचे अधिकारी चांगले असेल तरच कर्ज वाटप चांगल्या प्रमाणात होते. मात्र आजकाल शेतकऱ्यांना कर्ज दिले पाहिजे या मानसिकतेमध्ये बँका नाहीत खरिपाच्या आधी बँकेने कर्ज द्यायला पाहिजे जिल्हयात ५५ ते ६० टाक्यांच्या वर कर्ज वाटप झाले नसल्याचे हि शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. खरोखरच शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचे असेल तर बँकांनी शेतकऱ्यांच्याबांधावर अजून कर्ज द्यायला पाहिजे सध्या रब्बीचा हंगाम लवकरच सुरु होत आहे त्या करीता बँकांनी नियोजन करावे व कर्ज वाटप करावे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com